आशाताई बच्छाव
१८ जणांची फसवणुक करणाऱ्या टाकळीच्या तिघांना अटक
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – सीएनजी गॅसपंप मंजूर करण्याचे आश्वासन देवून सुमारे 20 लाख रूपये देवून देखील गॅस पंप मिळवून न देता फसवणुक केल्याप्रकरणी टाकळी प्र.चा.येथील संभाजी दगडू पाटील, अनिकेत संभाजी पाटील, व आकाश संभाजी पाटील यांना चाळीसगाव शहर पेालीसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात फसवणुक होणाऱ्यांची संख्या वाढून 18 वर गेली आहे.
स्वप्नील युवराज चौधरी यांनी फसवणुक प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात भादवि कलम 420,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपासादरम्यान एकुण 18 जणांची पशुपालन कर्ज, पर्सनल लोन,शेळी पालन कर्ज मंजुर करून देतो किवां अनुदान मिळवून देतो अशा कारणांसाठी पैसे घेवून त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज व अनुदान मिळवून न देता त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चौधरी यांच्यासह 18 जणांकडून संशयित संभाजी पाटील व त्याच्या दोघा मुलांनी सुमारे 30 लाख 54 हजार रूपये उकळून फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांना या गुन्ह्यात आणखी काही लोकांची फसवणुक झाल्याचा संशय आहे.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी व पोकॉ.अमोल पाटील हे करीत आहे.