आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
शिवराज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी ठेवण्यात आलेले नाटक तात्काळ रद्द करावे
डॉ. संजय लाखे पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
जालना (प्रतिनिधी) ः संपूर्ण जगाला आदर्श आणि प्रेरणास्थानी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी सावरकरांचे उदात्तीकरण करुन साक्षात छत्रपतींच्या स्वराज्याच्या आणि रयतेच्या राजधानी स्थळी किल्ले रायगड येथे साजरा होत असलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमात सावरकरांचे छत्रपती शिवाजी महाराज, शिवकाळ, शिवप्रेरणा यांचा काहीच संबंध नसलेले नाटक आयोजित करणे हे औचित्यहिन आणि दुर्दैवी तर आहेच पण हे तर तमाम शिवप्रेमींच्या जखमांवर ‘जात्यंध विचार’मंत्रीत’ मिठ चोळण्याचाच प्रकार आहे. आपली अतिशय प्रिय विचारसरणी म्हणून किंवा सावरकरांबद्दल ममत्व बाळगत इतरत्र कुठेही असा कार्यक्रम आयोजित केले तर आम्हाला त्यात आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. पण करोडो लोकांचे श्रद्धा आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपतींच्या किल्ले रायगड राजधानी या पवित्र ठिकाणी आणि 350 व्या शिवराज्याभिषेक प्रसंगी अश्या पध्दतीने या सावरकर लिखित नाटकाचे आयोजन करण्यात काहीच औचित्यपूर्ण, प्रासंगिक किंवा शिवप्रेरक आहे असे दिसत नाही तरी सदरील कार्यक्रम तातडीने रद्द करून राजधानी रायगड ठिकाण आणि शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक, प्रेरणादायी प्रसंगाचे पावित्र्य रक्षण करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे सकळ मराठा समाज राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला आदर्श आणि प्रेरणास्थानी असलेले आणि हजारो वर्षांच्या गुलामीच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वराज्य स्थापन करु