Home नंदुरबार शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत

90
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0012.jpg

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत.                                     नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सागर (गणेश) कांदळकर

जिल्ह्यात दोन वर्षात ४९ प्रस्तावांना मंजुरी ; ६७ प्रस्तावांवर चर्चा सुरुच

दोन लाखांची मदत

शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास योजनेंतर्गत मदत मिळते.
नंदुरबार : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन वर्षांत सादर करण्यात आलेल्या ११९ पैकी ४९ प्रस्तावांना विमा कंपन्यांनी मंजुरी दिली आहे. उर्वरित ६७ प्रस्तावांवर कामकाज सुरु आहे. अद्यापही जिल्ह्यातील ६७ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या रकमेची प्रतिक्षा आहे. ही रक्कम मिळावी यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती. यांतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कृषी विभागाच्या पाठपुराव्यानुसार विमा कंपन्यांकडून २ दोन लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यांतर्गत मयत शेतकऱ्यांच्या वारसांकडून कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर विमा कंपन्यांकडे पाठवल्या जातात. या विमा कंपन्यांकडे कागदपत्रांची पूर्तता करूनही वेळोवेळी नवीन कागदपत्रांची मागणी होते.

५५ प्रस्ताव, १६ जण पात्र

२०१९-२०२० या वर्षात ५५ प्रस्ताव शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे दिले गेले होते. यातील १६ मंजूर तर ३१ प्रस्ताव नामंजूर झाले.

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

कोणत्या तालुक्यात

किती पात्र ?

नंदुरबार

नवापूर

शहादा

तळोदा

अ. कुवा

धडगाव

डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या काळात दाखल झालेल्या या प्रकरणांपैकी १७ प्रकरणे तातडीने निकाली काढून त्यांना २ लाखांचा आधार देण्यात आला आहे.

 

दोन डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाख

एक अवयव

गेल्यास एक लाख

अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसा अर्ज कृषी विभागाकडे करावा लागेल.

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई शासनाकडून योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.

मदतीसाठी अर्ज कोठे कराल?

२३

विम्याच्या लाभासाठी शेतकरी १० ते ७५ या १ वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे. अर्जासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क करावा. अपघात घडल्यास वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.

२७

08

०६

०६

प्रत्येक प्रस्तावासाठी पाठपुरावा

कृषी विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता असलेले प्रस्ताव संबंधित विमा कंपनीला दिले जातात, त्यांच्याकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवली जाते. कागदपत्रांची पूर्तता करावयाची असल्यास तशी माहिती शेतकयांच्या वारसांना दिली जाते. यानंतरही काही अडचणी आल्यास दुसऱ्यांदा त्यावर चर्चा होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here