राजेंद्र पाटील राऊत
शुक्रवारी ११ मार्चला साजरा होणार
आश्रयआशा फाऊंडेशन आयोजीत
नारीसन्मान सोहळा २०२२
(सुभाष कचवे सिनियर रिपोर्टर)
मालेगांव- जागतिक महिला दिन,सावित्रीमाई फुले स्मृतीदिन आणि श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड जयंतीदिनाचे औचित्य साधत आश्रयआशा फाऊंडेशन,युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ११ मार्चला नारीगौरव सन्मान सोहळा २०२२ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,विविध क्षेत्रात आपल्या स्व- कर्तृत्वावर नावलौकिक करणाऱ्या रणरागिनी महिलांचा सन्मान सोहळा शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी मालेगांवच्या हरिकेश लाँन्स येथे आयोजीत करण्यात आला आहे.महिलांच्या सन्मानासाठी महिलांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती केशरबाई बाबूराव निकम,श्रीमती माया पाटोळे अप्पर जिल्हाधिकारी मालेगांव, श्रीमती लता एस दोंदे उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगांव,अँड सौ.ज्योती भोसले माजी उपमहापौर तथा नगरसेविका,सौ.पुष्पामाई बापूसाहेब मोरे मुख्य संचालिका हरिकेश लाँन्स मालेगांव उपस्थित राहणार आहेत.तर विविध क्षेत्रात कार्य कर्तृत्वाने नावलौकिक उंचावणा-या पुढील महिलांचा सन्मानचिन्ह,गौरवपत्र,कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा युवा मराठा वृतपत्राचा अंक व गुलाब पुष्प देऊन राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे.श्रीमती मंगला मधुकर अहिरे रावळगांव,सौ.तनया शरद भालेराव लखमापूर,सौ. रानू अमित लोया,सौ.चिंधाबाई अण्णा पगारे ठेंगोडा, सौ. रेखाताई प्रशांत सुर्यवंशी खालप,श्रीमती आशाताई शांतीलाल बच्छाव व-हाणे, कु.दिपालीताई सुनिल पवार आसखेडा,सौ.उषाताई संजय महाले पाटील,सौ.ललिताताई योगेश भदाणे यशवंतनगर,सौ.मनिषाताई तात्याभाऊ सोनवणे येसगांव,सौ.पुष्पामाई बापूसाहेब मोरे मालेगांव,सौ.निर्मलाताई विजय पवार मालेगांव,सौ.गितांजलीताई किशोर शिंदे मालेगांव,सौ.अरुणाताई सुभाष निकम दाभाडी आदी पंधरा रणरागिनी महिलांना सन्मानीत करुन त्यांचा यथोचीत गौरव केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या व्यशस्वीतेसाठी युवा मराठा न्युज चँनल आणि आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.