Home माझं गाव माझं गा-हाणं साखर उत्पादनासोबत इथेनॉल,वीज आणि हायड्रोजन उत्पादनाची गरज ; शरदचंद्र पवार

साखर उत्पादनासोबत इथेनॉल,वीज आणि हायड्रोजन उत्पादनाची गरज ; शरदचंद्र पवार

102
0

राजेंद्र पाटील राऊत

साखर उत्पादनासोबत इथेनॉल,वीज आणि हायड्रोजन उत्पादनाची गरज ; शरदचंद्र पवार
रानवड(निफाड)- सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालूका प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करत ऊसाला अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच कारखानदारी यशस्वी होण्यासाठी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन उत्पादन करावे असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरदचंद्र पवार यांनी केले. रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि. काकासाहेब नगर रानवड या कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आ. माणिकराव कोकाटे, आ. नितीन पवार, आ. किशोर दराडे, आ. सरोज आहिरे, हेमंत टकले, नानासाहेब बोरस्ते, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर महासंघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, नीलिमाताई पवार, अजिंक्य वाघ, शरद आहेर, नानासाहेब महाले, सुरेश बाबा पाटील, डॉ तुषार शेवाळे, पंढरीनाथ थोरे, माणिकराव थोरे,माणिकराव बोरस्ते, हंसराज वडघुले, सुवर्णा जगताप, ज्ञानेश्वर जगताप, प्रकाश दायमा, शिवाजी ढेपले, राजेंद्र डोखळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शरद पवार म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात राज्याच्या कारखानदारीचे नेतृत्व पूर्वी होत होते. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी राज्यातील कारखानादारांचे नेतृत्व केले. कुठलीही गोष्ट ठरविली ती योग्य असेल तर त्यात तडजोड करायची नाही असे काकासाहेब वाघ यांचे नेतृत्व होते. त्यांनी सुरू केलेला कारखाना हा बंद झाला आणि आता हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची हिंमत आमदार दिलीप बनकर यांनी दाखविली ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, सहकारी कारखान्यांचा जन्म हा मुळात महाराष्ट्रात झाला. या कारखान्यांनी राज्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले.केवळ साखर नव्हे तर इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन निर्मिती करण्याची गरज आहे. कारखान्यात जर या चार प्रकारची निर्मिती करण्यात आली तर नक्कीच साखर कारखाने यशस्वी होऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. राज्यातील काही कारखान्यांनी हा प्रयोग केला आहे. तो आपणही करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच यासाठी आवश्यक ती मदत आम्ही करी असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, कमीत कमी पाण्यात ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांची साथ असेल तर रानवड कारखान्याला यश नक्कीच मिळेल यात कुठलीही शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशातील कारखाने आणि धरणे ही देशातील रत्न आहे त्यातील एक एक रत्न विकण्याचे काम सद्याच्या सरकारकडून विकण्यात येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. पद्मश्री काकासाहेब वाघ यांनी सुरू केलेला कारखाना आमदार दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा सुरू केले ही अतिशय आनंदाची बाब आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तसेच निफाड कारखाना सुरू करण्यास आपले प्रयत्न आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी कारखाना यशस्वीपणे सुरू राहील यासाठी आहे. सदर कारखान्यात सोयी सुविधा करून तो यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले

Previous articleसाखर उत्पादनासोबत इथेनॉल,वीज आणि हायड्रोजन उत्पादनाची गरज ; शरदचंद्र पवार
Next articleसाखर उत्पादनासोबत इथेनॉल,वीज आणि हायड्रोजन उत्पादनाची गरज ; शरदचंद्र पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here