Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगांवातील परिस्थिती पुर्णपणे नियंत्राणात नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

मालेगांवातील परिस्थिती पुर्णपणे नियंत्राणात नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

212
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांवातील परिस्थिती पुर्णपणे नियंत्राणात नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
(राजेद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव- त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ आज बंद असलेल्या मालेगांव शहरात परिस्थिती खराब व तणावपुर्ण असल्याच्या वेगवेगळ्या बातम्या आज दिवसभर येत असल्याने मालेगांवची परिस्थिती नियंत्रणात असून,नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ आज मालेगांव शहर मुस्लिम समुदायाच्या काही संघटनानी बंद केलेले होते.त्यामुळे चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता,तरीही वेगवेगळ्या स्वरुपाच्या अफवा येत असल्याने नागरिकात चलबिचलात निर्माण झालेली होती.तर “युवा मराठा”ने मुस्लिमबहुल भागातील नागरिकांशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेतली असता आज दिवसभर मुस्लिमबहुल भागातील बहुतांशी व्यवहार सुरळीत सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.तर मालेगांवात आता रात्री उशिरा जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील हे मालेगांवात दाखल झालेले असून,परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी “युवा मराठा न्युज”शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here