Home नांदेड माहूर येथील देवीच्या दर्शनासाठी संस्थान व प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन...

माहूर येथील देवीच्या दर्शनासाठी संस्थान व प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

201
0

राजेंद्र पाटील राऊत

माहूर येथील देवीच्या दर्शनासाठी संस्थान व प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सव बाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज माहूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तासमवेत झालेल्या आढावा बैठकीत दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्रिका घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेशिका https://shrirenukadevi.in/ या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या भाविकांना ऑनलाईन प्रक्रीयेत सहभाग घेता येत नाही त्याच्यासाठी टी-पाईट माहूर येथे ऑफलाईन पासेसची सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

नवरात्र काळामध्ये भाविकांच्या सोयीसाठी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यत रेणूका देवी मंदिर खुले राहील. दर्शनासाठी पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. परराज्यातील भाविकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा 72 तासामधील आरटीपीसीआर अथवा 24 तासामधील रॅपीड ॲटीजेन टेस्ट असणे आवश्यक आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती , गर्भवती महिला व 10 वर्षाखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये दर्शनासाठी गडावर येऊ नये. त्याऐवजी रेणूका देवी संस्थानच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भाविकांना माहूर येथून रेणूका माता मंदिराकडे घेवून जाणे आणि आणण्यासाठी एसटी बसेसची सोय केली आहे.

Previous articleसटाणा तालुक्यातील धांद्री या गावी अतिवृष्टीने घातले थैमान
Next articleराज्यासाठी पुढील चार दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here