Home विदर्भ वाशिम कोरोना अनुदानासाठी मृतांच्या कायदेशीर वारसांनी २४ फेब्रुवारी रोजी कागदपत्रासह उपस्थित रहावे

वाशिम कोरोना अनुदानासाठी मृतांच्या कायदेशीर वारसांनी २४ फेब्रुवारी रोजी कागदपत्रासह उपस्थित रहावे

173
0

राजेंद्र पाटील राऊत

वाशिम कोरोना अनुदानासाठी मृतांच्या कायदेशीर वारसांनी २४ फेब्रुवारी रोजी कागदपत्रासह उपस्थित रहावे
मंगरुळपीर(रितेश गाडेकर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):-कोविड 19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 640 मृत व्यक्तीपैकी 353 मृत व्यक्तीच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही अशा 287 मृत व्यक्तीचीं यादी https://washim.gov.in या संकेतस्थळावर तालुकानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.287 मृत व्यक्तीच्या वारसदारांनी 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे तालुकानिहाय दिलेल्या वेळेत पुढील कागदपत्रासह उपस्थित रहावे. अर्जदाराचा स्वतःचा तपशील यामध्ये आधारकार्ड व त्यांच्या छायाकिंत दोन्ही बाजूची प्रत, अर्जदाराचे बँक पासबुक क्रॉस चेक, मृत पावलेला व्यक्तींचा तपशील यामध्ये आधारकार्डची दोन्ही बाजू, मृत पावलेल्या व्यक्तीची मृत्यु प्रमाणपत्र, एखाद्या नातेवाईकांचे नाव सानुग्रह अनुदान जमा करण्यासाठी इतर कुटुंबियांचे स्वयंघोषणापत्र (नाहरकत) व एमसिसिडी प्रमाणपत्र.या प्रमाणपत्राचा नमुना https://washim.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील कागदपत्रे स्पष्ट दिसेल अशे स्कॅन करून खाली दिलेल्या वेळेत नियोजन भवन येथे उपस्थित रहावे.वाशिम तालुका सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, मालेगाव तालुका 1 ते दुपारी 2 पर्यंत, रिसोड तालुका 3 ते दुपारी 4 पर्यंत, मानोरा व कारंजा तालुका दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि मंगरूपीर तालुका सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. तरी मृत पावलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांनी आवश्यक कागदपत्रासह 24 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन, वाशिम येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

Previous articleपेठवडगाव मध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी
Next articleलडकी हूँ लड सकती हूँ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here