Home जालना जालना क्रीडा प्रबोधिनीचे काम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासाठी पथदर्शक

जालना क्रीडा प्रबोधिनीचे काम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासाठी पथदर्शक

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_093309.jpg

जालना क्रीडा प्रबोधिनीचे काम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासाठी पथदर्शक
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, दि. १(प्रतिनिधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-जालना क्रीडा प्रबोधिनीच्या मुलींच्या संघाने
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्य पातळीवरील
कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब
ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी विजयी
संघातील खेळाडू विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित गौरव केला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहर प्रमुख घनश्याम
खाकीवाले, शहरप्रमुख दुर्गेश काठोटीवाले, विधानसभा संघटक दीपक रणनवरे व
आश्विन अंबेकर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलतांना
जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात खेळाचे
वातावरण नसल्याने जिल्ह्याचा क्रमांक नेहमीच सर्वात शेवटी असतो. जिल्हयात
कुठल्याही भौतिक सुविधा नाहीत, चांगले प्रशिक्षक नाहीत,सत्तेतील लोकांचा
व दानशुरांचा पाठिंबा नाही. यामुळे जिल्हात खेळाचे वातावरण नाही.त्यामुळे
खेळाडू तयार होत नाहीत. चांगले खेळाडू तयार होत नसल्याने अपवाद वगळता
राज्यात क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे स्थान असत नाही. अशा या निराशाजनक
वातावरणात काही शिक्षक पुढाकार घेतात व क्रीडा प्रबोधिनीची स्थापना
करतात.
शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील ५०
मुली व ५० मुले यांची निवड करून त्यांना क्रीडा प्रबोधिनी निवासी
सुविधेसह शिक्षणाची सोय उपलब्ध करून देतात. त्यांना दोन वेळचे जेवण,
नाश्ता, चहा अशा उच्च दर्जाच्या सुविधा देतात. यासाठी वर्षाला लागणारा
जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक
प्रत्येकी हजार रुपये वर्गणी करून देतात व त्यातून खर्च भागविला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here