Home कोकण रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या धन्वंतरी, आदर्श शिक्षक पुरस्कारांचे शानदार वितरण

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या धन्वंतरी, आदर्श शिक्षक पुरस्कारांचे शानदार वितरण

135
0

राजेंद्र पाटील राऊत

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या धन्वंतरी, आदर्श शिक्षक पुरस्कारांचे शानदार वितरण
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

राजापूर – रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० च्या दोन पुरस्कारांचे वितरण राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात आले. या वेळी धन्वंतरी पुरस्कार डॉ. बाळकृष्ण पाध्ये आणि आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. अनघा विश्वास प्रभुदेसाई यांना डॉ. अरुण जोशी यांच्या हस्ते वितरित केला.

या वेळी डॉ. बाळकृष्ण पाध्ये म्हणाले की, काही लोक डॉक्टरांना देव मानतात. परंतु अलीकडे डॉक्टर पैसे लुटतात, अशी लोकभावना निर्माण होत आहे. याच्याशी मी सहमत नाही. डॉक्टर व रुग्ण यांचे नाते सुधारावे. आपल्याकडे तीन पिढ्यांचे रुग्ण येतात. तेव्हा रुग्ण व डॉक्टर यांचे नाते दृढ आहे, यावर विश्वास ठेवावा. हल्ली ॲलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद यात भेद होतो आहे. प्रत्येक पॅथीचे काही गुण व काही मर्यादा आहेत. पण सर्व पॅथींचे प्रमुख उद्दिष्ट रुग्णांना बरे करणे हेच आहे, ज्याला जो मार्ग चांगला वाटतो, तो त्याने स्वीकारावा.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन, वेदमंत्रपठण करण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रमुख पाहुणे डॉ. अरुण जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक भेट देऊन सत्कार केला. श्री. हिर्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्याची माहिती, संघाच्या विविध योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत हळबे यांनी डॉ. बाळकृष्ण पाध्ये व सौ. अनघा प्रभदेसाई यांचे स्वागत केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई आणि डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमासाठी सहकार्य दिल्याबद्दल ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण करंबेळकर आणि सचिव रघुवीर बापट यांचा सत्कार करून आभार मानले. या वेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राजापूर वेदशाळेला देणगी देण्यात आली. दिलीप ढवळे यांनी आभार मानले. सत्कारमूर्ती डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या उपक्रमांसाठी भरघोस देणगी देऊन संघाच्या उपक्रमांस हातभार लावला आहे. त्याबद्दल संघातर्फे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here