Home पुणे कोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी...

कोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 🛑

465
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 🛑
✍️ पिंपरी-चिंचवड ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

पुणे:- ⭕कोकण खेड युवाशक्ती पिंपरीचिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव समारंभ व हळदी कुंकू समारंभ आनंदात पार पडला.

कार्यक्रमात आरोग्य,पोलिस,शासकीय व इतर विभागातील ज्यांनी कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावुन सेवा केली त्यांना *”कोरोना योद्धा “* म्हणुन ट्रॉफी,सन्मानपञ,नारळ,शॉल देवुन गौरवण्यांत आले.तसेच महिलांनी एकञ येवुन त्यांना व्यासपिठ मिळावे व महिलांना प्रोत्साहन देण्यांसाठी हळदी कुंकंवाचे आयोजन करण्यांत आले होते.या वेळी प्रमुख उपस्थिती मा.सौ.विजयाताई सुतार(मा.नगरसेविका),मा.सौ.अश्विनीताई जाधव(मा.नगरसेविका ),मा श्री.परेश मोरे सर (कामगार नेते),मा.श्री.अशोक कदम ,मा श्री राम सकपाळ ,मा श्री राम उत्तेकर ,श्री.रूपेश कदम , श्री गजानन मोरे , उद्योजक श्री.मनोहर यादव , श्री संदिप साळुंखे,श्री अभिजीत कदम व इतर मान्यवर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवर,उपस्थितीत बांधवांनी कोकण खेड युवाशक्तीच्या आतापर्यंत केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करून खुप खुप शुभेच्छा दिल्या.तसेच युवाशक्तीच्यावतीने भविष्यांत देखील सामाजिक, शैक्षणिक,कला क्रिडा व इतर समस्यां सोडवण्यासाठी अग्रगण्य राहिल अशी युवाशक्तीचे अध्यक्ष श्री.संजय मोरे यांनी ग्वाही दिली.

त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण खेड युवाशक्तीचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक श्री.अक्षय मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.संदिप कदम सर यांनी केले. ⭕

Previous articleपुण्यातील खून प्रकरणी कुख्यात गुंड मारणे याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता 🛑
Next articleजिल्ह्यातील 1103 गावातील जलजीवन मिशन आराखड्यास मंजुरी, शाळा,अगंणवाडी नळ तात्काळ जोडणी करावी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here