Home जालना पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.

82
0

आशाताई बच्छाव

IMG_20231112_115343.jpg

पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.
आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

२५ नोव्हेंबरपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोंडण्यात यावे,अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन  – सतीश घाटगे

अंबड / घनसावंगी/ जालना, (दिलीप बोंडे ) : समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या हक्काचं ८.६०८ टीएमसी पाणी हे तात्काळ सोडण्यात यावे.पश्चिम महाराष्ट्रातील नगर नाशिक भागातील नेत्यांच्या दबावामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी असतानाही ते सोडत नाही.त्यामुळे भाजप नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५२  वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तब्बल एक तास चाललेले या रास्ता रोको मुळे दुतर्फा वाहनाच्या पाच पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.

आमच्या हक्काचं पाणी कधी सुटेल याची लेखी हमी मिळत नाही,तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही,अशी भूमिका सतीश घाटगे यांनी घेतल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी दूरध्वनीवरून आश्वासन दिले.मात्र हे आश्वासन आम्हाला मान्य नाही.कधीपर्यंत पाणी सुटेल याची लेखी हमी तुम्ही द्या,त्याशिवाय मी उठणार नाही,असा आक्रमक पवित्रा घाटगे यांनी घेतल्या मुळे महसूल,जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासनाची भंबेरी उडाली.शेवटी पोलिसांनी सतिश घाटगे यांच्या सह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.  यावेळी मागण्याची निवेदन अंबडच्या नायब तहसीलदार धनश्री भालचीम,जलसंपदा विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता काकडे व स.पो.नि.रवींद्र ठाकरे यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here