Home नांदेड Breaking News: नांदेड शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के

Breaking News: नांदेड शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_173633.jpg

Breaking News: नांदेड शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के

मनोज बिरादार
मराठवाडा विभागीय संपादक

नांदेड : शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात (Nanded Earthquake) २१ मार्च रोजी गुरूवारी सकाळी 6 वाजून ८ मिनटाच्या दरम्यांन 4.5 रिश्टर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सदरिल भूकंपाच्या हादरा मोठा असल्याने घरे हादरली आणि भूगर्भातून एक मोठा आवाज बाहेर आला.यामुळे सकाळी गाढ झोपेत असलेल्या नागरिकांची झोपच उडाली.झोपीतून उठून नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही. परंतू नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षापासून वारंवार असे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिक मात्र आता चांगलेच भयभीत झाले आहेत.

3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजून 18 मिनटाच्या दरम्यांन नांदेड (Nanded) वाघाळा शहर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या (Nanded Earthquake) अनेक परिसरात 1.5 रिश्टर तीव्रतेच्या
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.आणि आज पुन्हा १८ दिवसांनी नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात भूकपांचे धक्के जाणवले आहेत.

यावेळी मात्र पुर्वीपेक्षा मोठे धक्के होते.सदरिल धक्के हे नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला बसले आहेत. सकाळी 6 वाजून 8 मिनिटाच्या दरम्यान एक मोठा आवाज झाला. या आवाजासह सोम्य धक्के (Nanded Earthquake) जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. दरम्यान यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले होते. यावेळी सायन्स कॉलेज परिसर हा भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध माहितीनुसार सदर धक्क्याची नोंद 4.5 रिश्टर एवढी असल्याची सांगण्यात आली आहे. यामुळे सदरिल धक्यात कुठलीही हानी झाली नसल्यामुळे (Nanded Earthquake) नागरिकांनी भयभीत होवून नये, असे आवाहन नांदेड जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleआचारसंहिता संपणारच आहे;मग यांच्याशी खेटू – मनोज जरांगे पाटलांचा परळीतून सरकारला इशारा
Next articleश्रीरामपूर शहर हद्दीवर ‘बिबट्या’ कॅमेऱ्यात कैद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here