Home कोरोना ब्रेकिंग कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

1150
0

⭕कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती!⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :- बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा) उभारले. याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही उपलब्ध आहे.

महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यात ६०० बेड्सची सुविधा आणि १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड-१९ चे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

नेस्को गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहे.

रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात उभारण्यात येतील.

३१ मे पर्यंत एनएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेस्को, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत कार्यरत

प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था

रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर
महानगरपालिका तर्फे दररोज ७ लाख अन्नाची पाकिटे वाटप
मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक

Previous articleकल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाच्या 38 रुग्णची वाढ तर चौघांचा मृत्यू !
Next articleबालेवाडीतील वाईन शॉपच्या मालकाला कोरोनाची लागण⭕
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here