Home पुणे सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारे खडकीतील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ

सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारे खडकीतील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ

171
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0004.jpg

सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारे खडकीतील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ
पुणे ब्युरो चिफ: उमेश पाटील
खडकी रेंजहिल्स येथील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ यंदा पस्तीसावे वर्ष साजरे करीत असून, आकर्षक गणेशमूर्ती आणि रोषणाई गणेश भक्तांना आकर्षित करीत आहे. मंडळ साधेपणाला प्राधान्य देत आलेले आहे. मंडळाच्या गणरायाची आरती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.
राष्ट्रीय मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविते. यंदा मंडळाने आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ओंकार राजू आसवले हे अध्यक्ष आणि अंजिक्य शेलार हे उपाध्यक्ष आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाईने तेजोमय प्रकाशात गणपती मूर्ती उजळून निघालेली आहे. आकर्षक श्रीगणेशाची मूर्ती हेही मंडळाचे वेगळेपण आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.
विविध परिसरातून बालचमू, नागरिक दर्शनासाठी येत असतात. मंडळाची दरवर्षी विसर्जन मिरवणूकही डोळ्याचे पारणे फेडणारी असते. मंडळाने कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, पूरग्रस्तांना मदत आदी विविध उपक्रम राबविले आहेत.

Previous articleपुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी
Next articleओबीसी संघर्ष समितीची देगलूर येथे बैठक संपन्न झाली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here