Home अमरावती गुन्हेगारी टोळीचे सदस्य: पुण्याहून पळून आलेले क्राईम युनिट ने पकडले.

गुन्हेगारी टोळीचे सदस्य: पुण्याहून पळून आलेले क्राईम युनिट ने पकडले.

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20231114_084406.jpg

गुन्हेगारी टोळीचे सदस्य: पुण्याहून पळून आलेले क्राईम युनिट ने पकडले.
————
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
पुणे येथील खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी केलेल्या अपहरणाच्या पुण्यात अटक काढण्यासाठी पुण्याहून अमरावतीत असल्यास आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अमरावती पोलिसांनी अटक नोव्हेंबर रोजी रात्री त्यांना अशी याड कॉलनी चौकातून एका कारमधून ताब्यात घेण्यात आले दोघांनाही पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ते पुणे जिल्ह्यातील मुळशी गुन्हेगारी टोळीचे सदस्य आहेत. विपुल उत्तम माझीरे (२६,रा. रावडे ता. मुळशी पो.स्टे.पौडपुणे ग्रामीण)व प्रदीप उर्फ पंकज धनवे (२७,रा. सिंहगड रोड दांडेकर पूल, दत्तवाडी पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहे तर संतोष धुमाळ (रा. मुळशी पुणे) हा तिसरा आरोपी पोलिसांची चाहूल लागतात पळून गेला. पुण्याच्या पौड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्ह्यातील संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पुणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आले होते, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस कडून अमरावती शहर पोलिसांना ९ नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती. ती जबाबदारी गुन्हे शाखा युनिट एक काकडे स्वप्नात आली. गुन्हे शाखा युनिट एकने आरोपीच्या शोधासाठी अमरावती शहरात हॉटेल, लॉज तसेच आरोपीच्या संभाव्य राहण्याच्या ठिकाणी शोध घेतला दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास स्थानिक गुंड सागर खिराडे यांच्यासोबत अन्न शहरातील तीन व्यक्ती कार मधून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. ती कार आशियाळ कॉलनी चौकात ट्रेस झाली. सागर खिराडे हा त्यांच्या कार्स दिसून आला. पोलिसांना पाहताच खिराडे हा तिथून अंधाराचा फायदा घेऊन एका इसमासह पळून गेला. तर विपुल व प्रदीप हे दोन आरोपी गुन्हे शाखेच्या हाती लागले. पुण्याहून आलेले हे आरोपी अमरावतीत मुक्कामी होते. आरोपी हे दोन दिवसापासून अमरावतीच्या शेगाव परिसरात राहत होते त्यांना अमरावती येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा सागर खिराडे यांनी असे दिल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिली. पळून गेलेला संतोष धुमाळ व अटक आरोपी विपुल माझी रे मोक्का केसमधील आरोपी असून दोन ते तीन महिन्यापूर्वी ते कारण सुटलेत. पोलीस आयुक्त नवीन चंद्र नेतृत्वात पोलीस अधिकारी आसाराम चोरमले व स.पो.नि. मनीष वाकोडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

Previous articleमध्य रेल्वे ला मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई, गेल्या वर्षाच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ.
Next articleआयुष्यमान भारत कार्ड बनण्यासाठी रेशन दुकानात गर्दी. रेशनच्या दुकानात बनताहेत “आयुष्यमान कार्ड:
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here