Home नांदेड आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त देगलूर येथील अंध विद्यालयात अन्नदान व मिठाईवाटप.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त देगलूर येथील अंध विद्यालयात अन्नदान व मिठाईवाटप.

145
0

आशाताई बच्छाव

IMG-20221207-WA0020.jpg

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त देगलूर येथील अंध विद्यालयात अन्नदान व मिठाईवाटप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
वीर सैनिक ग्रूप चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड ता. देगलूर च्या वतीने अंध विद्यालय मध्ये अन्नदान व मिठाई चे वाटप करण्यात आले. वीर सैनिक ग्रूप चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकारी व सुट्टीवर असलेल्या सैनिकांद्वारे पुढाकार घेऊन ग्रूप च्या ब्रिद व्याख्येनुसार “एक हात मदतीचा एक हात सुरक्षाचा” हा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील सेवारत सैनिक देशाची सुरक्षा करत असताना देखील सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ह्याच एक जिवंत उदाहरण आज समाजापुढे ठेवण्यातआल. सैनिकांच जितक कौतूक कराव तेवढ कमीच. ह्या काय॔क्रमास प्रमुख उपस्थितीत आदश॔ शिक्षक श्री तुळशीराम नरसिंगराव काले, खानापूरकर, पंचायत समिती देगलूर येथील विस्तार अधिकारी मा.डाॅ. श्री सुरेश लिंगना पाशमवार तसेच वीर सैनिक ग्रूप देगलूर चे उपाध्यक्ष मा. डॉ. श्री रविजी काळे (अस्थिरोग तज्ञ) यांच्या शुभहस्ते मुलांना जेवण व मिठाई वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीर सैनिक ग्रूप चे ग्रूप देगलूर चे मार्गदर्शक सुभेदार महेश देवापूरकर (सेवानिवृत्त) साहेब ,वीर सैनिक ग्रूप चे सचिव श्री संतोष मनधरणे, आणि वीर सैनिक ग्रूप चे कार्यकारी अध्यक्ष श्री इर्शाद पटेल, सैनिक इरवंत भंडरवार, सैनिक चक्रधर तडकोले, सैनिक शिवराज जांभळीकर , वीर सैनिक ग्रूप चे समस्त परिवार आणि मित्र मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.

Previous articleयुवासेना तालुकाप्रमुख पदी सचिन पाटील हिवराळे यांची निवड.
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here