🛑 मुंबईतील ५० लाख लोकांना…! कोरोना होऊन गेला 🛑

0
27

🛑 मुंबईतील ५० लाख लोकांना…! कोरोना होऊन गेला 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मुंबई महानगरातील 74 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला असून, ते त्यातून बरेही आले आहेत. मुंबईकरांमध्ये सामूहिक प्रतिकारक शक्‍ती तयार झाल्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेचा निष्कर्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे.

अन्य काही संस्थांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी केलेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेच्या निष्कर्षातच हर्ड इम्युनिटीची (सामूहिक प्रतिकारक शक्‍ती) बाब उघड झाली आहे. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकार यांनी कोरोनाशी लढा देऊन रुग्णसंख्या कमी केल्याचा आणि कोरोनामुक्‍तांची संख्या वाढविल्याच्या दाव्यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

सेरोलॉजिकल सर्व्हेमध्ये मुंबईतील 6,936 जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी कुणालाही कोरोनाची लक्षणे नव्हती. केवळ पॉझिटिव्ह झालेल्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी झोपडपट्टीत राहणार्‍या 57 टक्के आणि पक्क्या इमारतीत राहणार्‍या 17 टक्के लोकांना कोरोना आधीच होऊन गेला होता आणि ते त्यातून बरेही झाले होते, असे दिसून आले. म्हणजेच त्यांच्यात कोरोनाचे प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार झाले होते.

मुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात याचा विचार केल्यास असे दिसते की, मुंबईची लोकसंख्या आहे 1 कोटी 30 लाख. त्यापैकी सुमारे 55 टक्के म्हणजे 71 लाख लोक झोपड्यांत राहणारे मानले, तर त्यापैकी 57 टक्के, म्हणजे सुमारे 40 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होऊन गेली. मुंबईतील 45 टक्के, म्हणजे 58 लाख 50 हजार नागरिक इमारतींमध्ये राहतात. यापैकी 16 टक्के, म्हणजे 9 लाख 36 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. याचा अर्थ मुंबईतील 49 लाख 83 हजार, म्हणजे सुमारे 50 लाख नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 38 टक्के इतके होते. सेरोलॉजिकल सर्व्हेतून काढलेला हा निष्कर्ष आहे…….⭕

Previous article🛑 लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार 🛑
Next article🛑 कर्ज घेण्याचा विचारात आहात….! मग तुमच्यासाठी आहे खुशखबर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here