🛑 गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं असेल तर आधी मुंबईत कोरोना टेस्ट करा 🛑

0
29

🛑 गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं असेल तर आधी मुंबईत कोरोना टेस्ट करा 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 ऑगस्ट : ⭕ 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य करण्यात आली आहे. सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यासच संबंधितांना प्रवास करता येईल.

यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड – 19 ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही.

तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही. असे एस.टी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. 6 ऑगस्टपासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. आजपर्यंत तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे.

सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून, कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी व नैसर्गिक विधीसाठी वाहने थांबवण्याची दक्षता महामंडळाने घेतली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी विनंती एस.टी महामंडळाकडून करण्यात आली आहे.⭕

Previous article*कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक* *घडामोडी*
Next article🛑 लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here