एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत तिस-या आठवड्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव –

0
37

एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत तिस-या आठवड्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

जालना दि. ८ – कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत तिस-या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये उत्कृष्ट डॉक्टर तनवीर यांना चार हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन भगवान चाटसे यांना तीन हजार रुपयांचा धनादेश, श्रीमती सारीका कांबळे यांना दोन हजार रुपयांचा तर मोसीन निखार मोसीन यांना एक हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप तर तिस-या आठवड्यातील बक्षिसांची रक्क्म जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here