🛑 एअर इंडियाला या कंपनीने दिला झटका, ३३ मिलियन डॉलरची उधारी 🛑

0
22

🛑 एअर इंडियाला या कंपनीने दिला झटका, ३३ मिलियन डॉलरची उधारी

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 ऑगस्ट : ⭕ कर्जात बुडालेली सरकारी मालकीची कंपनी एअर इंडिया आधीच अनेक संकटांना तोंड देत आहे. अशातच कंपनी समोर आणखी एक मोठे संकट आले आहे. एअर इंडियाकडील बोईंग ७८७ आणि ड्रीमलाइनर यापुढे उड्डाण करण्याची शक्यता वाटत नाही.

बोईंग ७८७ आणि ड्रीमलायनर या दोन्ही कंपन्यांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी बोईंगची उधारी न दिल्यामुळे कंपनीने विमानाचे खराब झालेले पार्ट दुरुस्त करून देण्यास नकार दिलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोईंगचे एअर इंडियाने जवळजवळ ३३ मिलियन डॉलर देणे आहे.

अमेरिकन कंपनी बोईंगने १ ऑगस्ट रोजी एअर इंडियाला या संदर्भात पत्र पाठवले आहे. यात तत्काळ कंपनीकडून दिला जाणारी सपोर्ट सर्व्हिस कंपोनेंट सर्व्हिस एग्रीमेंट नुसार निलंबित केली जाणार आहे. या घटनेवर नजर ठेवणाऱ्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोईंगने एअर इंडियाला ड्रीमलायनरसाठी नवे पार्ट देण्यास नकार दिला आहे.

बोईंग कंपनीने केलेल्या दाव्यानुसार स्पेअर पार्ट्स रिप्लेसमेंट स्कीममुळे कंपनीची ३० टक्के बचत होते.

विमान निर्मिती करणारी अन्य एक कंपनी कोलिंस एयरोस्पेशने एअर इंडियाला इशारा दिला आहे. कंपनीने धकबाकीसाठी एअर इंडियाला १ आठवड्याची मुदत दिली आहे. एअर इंडियाला कोलिंसकडून ड्रीमलायनरसाठीच्या रिसीवर ट्रान्समीटर आणि हाय फ्रिकव्हेंसी कपल्स सारख्या गोष्टींचा पुरवठा केला जातो. या शिवाय ड्रीमलायनरचे उड्डाण होऊ शकत नाही.

सध्याच्या घडीला एअर इंडियावर एअरक्राफ्ट वेंडरांचे ६५ मिलियन डॉलर देणे आहे. यातील ३३ मिलियन डॉलर फक्त बोईंगचे देणे आहे. बोईंगने १५ ऑगस्टपर्यंत काही रक्कम आणि उर्वरित रक्कम कधी देणार याची तारीख सांगण्यास सांगितले आहे.⭕

Previous article🛑 बँक आँफ इंडियामध्ये नोकरीची संधी….! परीक्षा नाही, फक्त मुलाखत….! 🛑
Next article🛑 रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट स्थिर, पतधोरण जाहीर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here