🛑 बँक आँफ इंडियामध्ये नोकरीची संधी….! परीक्षा नाही, फक्त मुलाखत….! 🛑

0
29

🛑 बँक आँफ इंडियामध्ये नोकरीची संधी….! परीक्षा नाही, फक्त मुलाखत….! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असे असले तरी सरकारी नोकऱ्यांचा सध्या पाऊस पडत आहे. !

एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यामध्ये 42020 एवढा पगार मिळणार आहे.

बँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटीनुसार अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.

पदे आणि वेतन
अधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये. क्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा पगार दिला जाणार आहे.

अर्ज कोण करु शकतात
अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे आवश्यक आहे.

याशिवाय ए, बी आणि सी कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे आवश्यक आहे. तर क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्या 10वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच डी श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.

वयाची अट
या भारतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01 जुलै 2020 च्या आधारे केली जाणार आहे.

अर्जासाठी शुल्क
या जागांसाठी एससी/एसटी/पीडब्ल्यूडी मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. तर इतर उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येऊ शकते. या भरतीसाठी उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करु शकता.

अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख देखील 16 ऑगस्ट 2020 हीच आहे…..⭕

Previous article🛑 ” काँग्रेस – राष्ट्रवादी ” च्या दबावामुळे….! शिवसेनेने हिंदुत्व सोडलं….! 🛑
Next article🛑 एअर इंडियाला या कंपनीने दिला झटका, ३३ मिलियन डॉलरची उधारी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here