🛑 मुंबईत हायअलर्ट! 9 तासांतच 229 मिमी पाऊस, 26 जुलैची आठवण करुन देणारी स्थिती 🛑

0
20

🛑 मुंबईत हायअलर्ट! 9 तासांतच 229 मिमी पाऊस, 26 जुलैची आठवण करुन देणारी स्थिती 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 ऑगस्ट : ⭕ मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील तीन तासात मुसळधार अति मुसळधार पाऊस पडेल. ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे 26 जुलैची आठवण करून देणारी स्थिती निर्माण होते की अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोलाबा वेधशाळेनं दिलेली माहिती अशी की, गेल्या 9 तासांत 229.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.

दुसरीकडे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून मुंबईकरांना वादळी वारासह पावसात खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी आवाहन केलं आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये मुंबई पेलिसांशी 100 या क्रमांकावर अथवा ट्विटरवर संपर्क साधवा, असही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, दक्षिण मुंबईत वादळ वारा व जोरदार पाऊसमुळे काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, महात्मा फुले मंडई, वूड हाऊस मार्ग कुलाबा, बॅकाबे आगार समोर या भागात वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे.⭕

Previous article🛑 मुंबईत पावसाची दमदार हजेरी 🛑
Next article🛑 वादळी पावसात ट्रॅकवरच अडकली लोकल, 400 लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीमला केलं पाचारण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here