*नोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरिता मोफत मोबाईल टॅब देण्यात यावे.* *सय्यद मिनहाजोद्दीन*

0
31

*नोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरिता मोफत मोबाईल टॅब देण्यात यावे.* *सय्यद मिनहाजोद्दीन*

बीड ( युवा मराठा न्युज नेटवर्क) सद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून सर्व शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे मूलांचे शिक्षण आॅनलाईन पध्दतीने घेण्याचा शासनाचा निर्णय असल्यामूळे तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात हा मोल मजूर कामगार वर्ग राहत असून सध्याच्या परिस्थिती मध्ये कामगार मजूरांना हाताला काम नसल्यामुळे रोजचे दैनंदिन जिवन जगने मश्किल झालेले आहे.

अशा बिकट परिस्थितीत कामगार आपल्या मूलांना आॅनलाईन शिक्षण घेण्या करिता ” स्मार्ट फोन ” घेऊन देणे मूश्किल झाले आहे. व ते घेणे सद्य स्थितीत कदपी शक्य न होनारे आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणी कष्टकरी कामगारांच्या मूलांनी शिक्षणसाठी आपल्या गरीबीच्या हलाकिच्या परिस्थितीत आपल्या मजूर पालकांच्याकडून ” स्मार्ट फोन” मिळत नसल्यामुळे नैरश्यतून आत्महत्या केलेली असून आपले जिवन संपवले आहे. ही बाब अत्यंत गांभीर्यानेि घेणे गरजेचे आहे.

या परिस्थितीत कष्टकरी कामगारांच्या मूलांचे शैक्षणिक नूकसान होणार आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य मूंबई यांच्याकडे बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी शिल्लक असणारा कोट्यवधीच्या शिल्लक
निधी मधून शैक्षणिक आर्थिक साह्य या योजने अंतर्गत मंडळाच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या दोन मूलांना मोफत ” मोबाईल टॅब ” विना विलंब देण्यात यावा.

तसेच कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मूलांचे होणारे शैक्षणिक नूकसान व त्या नूकसानी मूळे होणार्या आत्महत्या रोखण्यासाठी निर्बंध आणि उपाय योजना राबवाव्यात कारण आजची मूले हे उद्याचे देशाचे भविष्य आहे .त्यामुळे सर्व गोरगरिब कूटूंबातील मूले शिकली पहीजेत .त्याचबरोबर सूरक्षित राहीली पाहीजेत.या करिता निधीमधून तात्काळ विना विलंब बांधकाम कामगारांच्या मूलांना ” मोबाईल टॅब ” देण्यात यावा.

आशी मागणी चे निवेदन मा जिल्हाधिकारी बीड यांच्या द्वारे मूख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य देण्यात आले. निवेदन देताना मराठवाडा बांधकाम मजूर व ईतर कामगार संघटनेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन.संस्थापक अध्यक्ष शफीक पठाण. अध्यक्ष रफीक मोमीन.कार्यकरीणी नदीमोद्दीन काजी .अश्विनी फाटक उपस्थित होते.

Previous articleखालप विकास सोसायटीत अपहार ; तत्कालीन सचिव व मदतनीस विरोधात गुन्हा दाखल
Next article   *पालघर जिल्ह्यात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हाधिकारी शिंदेचे आवाहन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here