🛑 पुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार…! पुणे व्यापारी महासंघाच्या मागणीस…! अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद 🛑

0
27

🛑 पुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार…! पुणे व्यापारी महासंघाच्या मागणीस…! अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : -⭕पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळा ने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीआज मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका ,सचिव महेंद्र पितळीया व विपुल अष्टेकर उपस्थित होते .

त्यावेळी झालेल्या चर्चे मध्ये पुण्यातील व्यापाऱ्यांचा P1/ P2 या पद्धतीला तीव्र विरोध असून आम्हाला आता पूर्वीप्रमाणे मुक्त पणे सातही दिवस व्यवसाय करू द्यावा हि आग्रहाची मागणी करण्यात आली त्याला अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद देत तेथूनच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.विक्रमकुमार यांना फोनवर सूचना देऊन आजच त्वरित तसे परिपत्रक काढण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आयुक्तांनीहि आजच तसे आदेश काढले .सणासुदीचा काळ व मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आहे .

यावेळी गेल्या पाच दिवसात कर्मचाऱ्यांच्या झालेल्या तपासणी मध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ३ टक्के पेक्षा कमी असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

व्यापाऱ्यांचा मागणीस पाठिंबा देऊन सहकार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हा अधिकारी नवल किशोर राम,महापालिका आयुक्त विक्रमकुमार,अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांचे महासंघातर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले….⭕

Previous article🛑 मनसेचा…..! ठाकरे सरकारला इशारा 🛑
Next article🛑 कोरोना पाण्यात ‘ इतका वेळ राहु शकतो 🛑 ✍️ मॉस्को
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here