🛑 ५ कामगार ठार, नागपूरजवळच्या बेला येथील साखर कारखान्यात स्फोट 🛑

0
179

🛑 ५ कामगार ठार, नागपूरजवळच्या बेला येथील साखर कारखान्यात स्फोट 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर, 02 ऑगस्ट : ⭕ नागपूर जवळच्या बेला येथील मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट होऊन पाच कामगार ठार झाले आहेत. ही भीषण दुर्घटना घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मंगेश प्रभाकर नौकरकर (वय २१) , लीलाधर वामनराव शेंडे (वय ४७), वासुदेव विठ्ठल लडी (वय ३०), सचिन प्रकाश वाघमारे (वय २४) व प्रफुल्ल पांडुरंग मून (वय २५ ) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण वडगाव येथील रहिवाशी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण कारखान्यात काम करीत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली व गोंधळ निर्माण झाला. स्फोटात पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेला येथे धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.⭕

Previous article🛑 लोकल ब्रँडचे हॅल्मेट वापरल्यास आता होणार दंड; जाणून घ्या, नवा नियम 🛑
Next article🛑 सेनेचा हल्लाबोल, भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here