🛑 कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १ 🛑

0
30

🛑 कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १ 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 2 ऑगस्ट : ⭕ अकरावी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यावर्षी ११ वी प्रवेशाचा रेजिस्ट्रेशन फॉर्म स्वतः मोबाईल/कॉम्पुटरवर ऑनलाइन भरायचा आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कदाचित शाळांची मदत विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत…

➡️ सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करा एक फॉर्म दिसेल.

https://mumbai.11thadmission.org.in/Registration/Registration.aspx

➡️ एमएमआर रिजनमधील विद्यार्थ्यांनी Within MMR Area वर क्लिक करा. इतरांनी Outside MMR Area तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी Outside Maharashtra Area या पर्यायावर क्लिक करा.

➡️ Fresher वर क्लिक करा.

➡️ SSC वर क्लिक करा.

➡️ Seat No. बॉक्स मध्ये तुमचा स्वतःचा 10वी परीक्षा बैठक क्र.(Seat No.) लिहा. उदा. A011025.

➡️ Seat No.च्या खाली लाल रंगातील Get SSC Data वर क्लिक करा.

➡️ तुमचे पूर्ण नाव, आईचे नाव व इतर माहिती तुम्हाला दिसेल.

➡️ Mobile Number बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल नं. टाका.

➡️ Security Question पुढे Select ला क्लिक करा त्यातील एक प्रश्न निवडा, त्याच्या पुढच्या बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहा. उदा. What is the name of your grandfather?

पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या आजोबांचे नाव लिहा.

(तुम्ही कोणताही प्रश्न निवडू शकता व त्याचे उत्तर लिहून तो प्रश्न व उत्तर लक्षात ठेवा)

➡️ तुमच्या 11वी ऍडमिशन फॉर्मचा पासवर्ड तुम्ही सेट करा पुढच्या बॉक्स मध्ये परत तोच पासवर्ड लिहा व लगेच ते वहीत लिहून घ्या व लक्षात ठेवा.

➡️ CAPCHA CODE बॉक्स मध्ये त्या बॉक्स खाली जे दिसते आहे सेम तसेच पाहून लिहा(टाईप करा).

➡️ वरील तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर परत एकदा चेक करून खालील हिरव्या Register बटन वर क्लिक करा.⭕

Previous article🛑 यंदाचा गणेशोत्सव सेवा उत्सव म्हणून होणार ..🛑
Next article🛑 लोकल ब्रँडचे हॅल्मेट वापरल्यास आता होणार दंड; जाणून घ्या, नवा नियम 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here