🛑 ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून २ वर्ष तडीपारीची नोटीस 🛑

0
29

🛑 ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून २ वर्ष तडीपारीची नोटीस 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 1 ऑगस्ट : ⭕ मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. वसई-विरार महापालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलन प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. या नोटीशीनंतर अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त करत या नोटीशीला न घाबरता माझे लोकांसाठीचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले.

ठाणे महापालिकेने कामावरुन काढलेल्या नर्सेसना न्याय मिळवून देण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेबाहेर आंदोलन करत असताना अविनाश जाधव यांना ही नोटीस देण्यात आली. यावेळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. “मी अनेक वर्ष लोकांसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. आतापर्यंत एकदाही मी स्वतःसाठी आंदोलन केले नाही. आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून कामासाठी ठाण्यात आलेल्या मुलींसाठी मी आंदोलन करत आहे. हे आंदोलन करत असताना मला तडीपारीची नोटीस पाठविण्यात आली आहे.”

आपला संताप व्यक्त करताना अविनाश जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेत मी म्हणालो होतो. एकदिवस मला तडीपारीची नोटीस मिळेल. त्याप्रमाणे आज ती मिळाली आहे. लोकांसाठी केलेल्या आंदोलनाचे बक्षिस महाराष्ट्र सरकारने दिले असल्याचे ते म्हणाले. ५ ऑगस्टपासून मी कोकणासाठी मोफत बस सोडणार होतो, त्याआधी मला जिल्ह्यातून बाहेर काढले जात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नोटीस आली असली तरी इथून पुढेही लोकांसाठी असेच काम करत राहील, असेही जाधव यांनी सांगितले.

वसई-विरार महापालिकेच्या आंदोलनबद्दल ही नोटीस त्यांना बजावण्यात आली असली तरी ४ ऑगस्टपर्यंत विरारच्या उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मुदत अविनाश जाधव यांना देण्यात आली आहे.⭕

Previous articleनांदेड जिल्ह्यात आज कोरोनाची अतिवृष्टि ; १५४ बाधितांची भर तर ४१ रूग्ण बरे व तिघांचा मृत्यू –
Next article🛑 **नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन; महिनाभरात राष्ट्रवादीने दुसरा नगरसेवक गमावला* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here