कोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार

0
35
  1. कोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार माजवला आहे, लोक भितीने मरत आहेत याचे एकच कारण आहे योग्य ती जनजागृती करण्यात आपण कमी पडत आहोत, बाधित झाल्याचा रिपोर्ट आला की आपण आता मेलो असे समजून घाबरुन जाऊ नका, मन खंबीर करा व आपण बरे होणार असा आत्मविश्वास बाळगा खचून जाऊ नका मित्रानो कोरोना आजारावर अजुन लस उपलब्ध नाही तरी आपण बघतो की बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत आहे आमच्या रावळगावचे नानाजी विक्रम जाधव व त्यांचे कुटुंब, निशांत बोरसे व कुटुंब, दिलीप वाघ हे यातून बरे होउंन घरी परत आले आहेत , कोरोना बाधित झालो आता आपण संपलो या भितीने नानाजी जाधव यांचा रक्तदाब वाढला होता त्यावेळी मी त्याला फोन करुन सांगितले अरे खुप बाधित रुग्ण बरे होत आहेत, घाबरु नको, तू पन बरा होशील आणी झाला देखील बरा त्यामूळे देवाने आपल्या शरिरात जी प्रतिकार शक्ती दिली आहे तिचा वापर करा मनोबल वाढवा सकरात्मक रहा फक्त काळजी घेतली की हा रोग बरा होईल व आपण नक्की मात करु यावर, कितेक लोक भितिपोटी आपले जिव गमावत आहेत, भरपूर व्यायाम करा, वेसना पासुन दूर रहा, परमेश्वरा वर विश्वास ठेवा, देवाने आपल्या शरिरात अनेक आजारावर युध्द करण्याची शक्ती दिली आहे ती जागृत करा, तिला चालना दया बघा मग आपण कसे या आजाराला पळवुन लावतो, मित्रांनो सध्याची भयावह स्थिती बघुन हे दोन शब्द लिहावे असे वाटले माझे सर्व समाजसेवक, जन प्रतिनिधि याना एकच सांगने असेल आपण जन जागृती केली पाहिजे कारण खुप मोठ्या प्रमाणावर जनता या बाबत गोधळली आहे, खुप लोक यातून बरे होउन आता निरोगी होत आहेत हे लोकांना समजले की नक्कीच लोकांचे मनोबल वाढेल व त्यांचा आत्मविश्वास वाढून प्रतिकार शक्ती वाढेल ही खुप महत्वाची बाब आहे.
Previous articleविविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांकडून निवेदने सादर
Next article🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत…! विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here