🛑 राज्यात येणार नवा सातबारा …! सुटसुटीत होण्यासाठी केले तब्बल ११ बदल 🛑

0
27

*

🛑 राज्यात येणार नवा सातबारा …! सुटसुटीत होण्यासाठी केले तब्बल ११ बदल 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा आहे. पण जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता तुम्हाला नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे. राज्य सरकार लवकरच साधा आणि सोपा असा सातबारा तयार करणार आहे.

सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन सातबारा तयार करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यासंबंधातील प्रस्ताव हा राज्य शासनाला पाठवण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सादरीकरणदेखील करण्यात आलं आहे.

आता वापरात असलेला शासकीय भाषेतील सातबारा हा थोडा किचकट आहे.

यातल्या नोंदी आणि भाषा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने या ब्रिटिशकालीन साताबाऱ्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्य समन्वक आणि उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे.

रामदास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन साताबाऱ्यामध्ये वेगवेगळे असे तब्बल 11 बदल करण्याचं सुचवण्यात आलं आहे. यामध्ये पहिल्यांदाचा महाराष्ट्र शासनाचा लोगो, गावाचा बारकोड असे अतिशय महत्त्वाचे आणि सोपे बदल करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या सातबारामध्ये गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबत LGD कोड दाखवण्यात येणार आहे. सातबारा 7 मध्ये खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्क करण्यासोबत नमूद केला जात होता. पण आता नवीन सातबारानुसार खातेदार/खातेदारांच्या नावा सोबतच नमूद केला जाईल अशी माहिती देण्यात आली. यामुळे साताबारा भरणं आणि माहिती सुटसुटीत दिसेल.

नवीन सातबाऱ्यामध्ये लागवडी योग्य क्षेत्र, क्षेत्राचं एकक खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार आणि इतर माहितीत बदल करण्यात येणार आहे…⭕

Previous article*जागतिक संवर्धन दिवसाच्या निमित्ताने प्राचिन मंदिराचे संवर्धन..*
Next article🛑 SSC Result 2020: इयत्ता दहावीचा निकाल  🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here