दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता होणार जाहीर

0
29

दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता होणार जाहीर

प्रतिनिधी= किरण अहिरराव

कोल्हापूर – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल उद्या (ता.29) दुपारी एक वाजता जाहीर होत आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. कोरोनामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला असला तरी त्याची विद्यार्थ्यांत उत्सुकता आहे.

यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम उशीरा झाले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी निकाल जाहीर होतो. यंदा मात्र निकाल जाहीर करण्यासाठी जुलैचा शेवटचा आठवडा उजाडला आहे. कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागातून तब्बल 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
विद्यार्थ्यांना www.maharesult.nic.in वेबसाईटवरून निकालाची प्रत उपलब्ध होणार आहे. तसेच www.mahsscboard.in वेबसाईटवरून कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट, तर छायाप्रतीसाठी 18 ऑगस्टपर्यंत http://verification-ssc.ac.in वेबसाईटवर शाळांतर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Previous articleबोईसर येथील चित्रालया टेप्स गेट च्या समोरील ct parik petrol pump इथे महावितरणचे 14 हजार वॉल्ट चे पोल पडून थरारक आवाज.
Next article*कधीच न विसरता येणार अश्या आपल्या रावळगावच्या क्रिडा शेत्रातील गोड आठवनी* नाशिक ,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here