व-हाणे सोनज ग्रामस्थांचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे* *कायदा हातात घेऊन बंधारा फोडण्याचा प्रयत्न;व-हाणे ग्रामस्थांचा विरोध*

0
30

*व-हाणे सोनज ग्रामस्थांचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे*
*कायदा हातात घेऊन बंधारा फोडण्याचा प्रयत्न;व-हाणे ग्रामस्थांचा विरोध*
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या सोनज्या डोंगरामागील आमराई जंगलातील बंधारा फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोनज ग्रामस्थांना कडाडून विरोध करताना आज व-हाणे ग्रामस्थ मंडळी दिसून आली.
याबाबतीत प्राप्त सविस्तर माहिती अशी की,व-हाणे व सोनज गावाच्या सीमारेषेवर सोनज्या डोंगर असून, या डोंगरामागे असलेल्या आमराई नावाच्या जंगलात तुंडूंब पाण्याने भरलेला एक बंधारा आहे.या बंधा-याच्या पाण्यावर व-हाणे ग्रामस्थ आपली शेती कसत असतात. या बंधा-यातून व-हाणे गावाला शेती व इतर कामासाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाट चारीचे काम यापुर्वीच पुर्ण करुन घेण्यात आलेले आहे.आणि यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस होत असल्यामुळे हा बंधारा तुंडूंब भरलेला आहे.त्यामुळे व-हाणे गावाचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला असतानाच आज सकाळी मात्र सोनज गावातील नागरिकांनी डोंगरामागील हा बंधारा पोकँलन मशिनच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याने व-हाणे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली व नागरिक तात्काळ बंधारा स्थळावर पोहचली.या घटनेची माहिती मिळताच मालेगांव पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाचे अभियंता शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा!मात्र मात्र भविष्यात या पाणीप्रश्नावरुन व-हाणे व सोनज ग्रामस्थांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे आतापासूनच निर्माण झालेली आहेत.

Previous articleहँन्ड सँनिटायझरचा जास्त वापर करू नका. ” केंद्र सरकार”*
Next article* नांदेड येथुन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची उचलबांगडी – नांदेड,दि, २७ ; राजेश एन भांगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here