🛑 ११ ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; Login ID, Password मिळणार 🛑

0
21

🛑 ११ ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; Login ID, Password मिळणार 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 27 जुलै : ⭕ राज्यातील मुंबई महानगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र, सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग १ भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग १ भरायचा होता. मात्र, आता हा अर्ज १ ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.

११ वी ऑनलाईन प्रवेशाबाबत कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण, अद्याप विद्यार्थी आणि पालकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचांलकना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी, असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.

⭕ अर्ज भरण्याचे वेळापत्रक :-

➡️ २६ जुलै २०२० पासून ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे.

➡️ लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार करणे.

➡️ १ ऑगस्ट पासून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून ११ वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग – १ भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे.

➡️ अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे.

➡️ विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती तपासून (Verify) करून अर्ज पूर्णपणे भरणे.

➡️ १० वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- २ महाविद्यालय पसंती क्रमांक भरणे.⭕

Previous article🛑 दादरमध्ये फेरीवाले, मंडईतून होतो कोरोनाचा प्रसार 🛑
Next article🛑 पुरंदरच्या तहापासून राखीव ठेवलेला कोरीगड 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here