*एस.टी.कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती लागू करा.*

0
26

परिवहन मंत्री अनिल परब आणि एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे.     *एस.टी.कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती लागू करा.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्यूज.)*

*एसटी मधील २७ हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करा* *महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसने केली* *मागणी .*

एसटी महामंडळाच्या 1लाख 2000 कर्मचाऱ्यांपैकी *जेष्ठ 27 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी* तसेच *कंत्राटी पद्धतीवरील 1 हजार 600 कर्मचाऱ्यांच्या जागी एसटी मधिल कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी* त्या मुळे खर्चात मोठी बचत होऊन उर्वरीत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल भविष्यात वेतन वाढ सुद्धा करता येईल अशा मागणीचे पत्र मागणीचे पत्र *महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस* या संघटनेने, परिवहन *मंत्री अनिल परब* यांच्याकडे दिले आहे.

_*महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी*_
लॉक डाऊनमुळे एसटी महामंडळाचे *दररोज 22 कोटी इतके उत्पन्न बुडत आहे.* एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर तसेच पूर्ण वेतन मिळत नाही.गेले तीन महिने वेतन उशिरा व कमी मिळत असल्याने व अगोदरच वेतन तुटपुंजे असल्याने कर्मचाऱ्यांनाआपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या तसेच शाळा कॉलेजमध्यें शिक्षणासाठी मूले असलेल्या कर्मचाऱ्यांना तर भयंकर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहें. त्यामुळे *डीजल तसेच वेतनावर* होणाऱ्या खर्चावर तत्काळ मर्यादा आणावी लागणार आहे. डिझेलवरील केंद्र व राज्य सरकारचा कर माफ केला पाहिजे यासाठी महामंडळा कडून प्रयत्न व्हायला हवेत. *याशिवाय 27 हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांना फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणली* व ते स्वेच्छेने निव्रूत झाले तर वेतन खर्चात मोठी बचत होऊ शकेल.तसेच कंत्राटी पद्धतीवरील अंदाजे *1600 कर्मचाऱ्यांच्या* जागेवर एसटी मधील अतिरिक्त कर्मचारी वर्ग वापरला पाहिजे.त्या मुळे सुद्धा मोठी बचत होणार आहें. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
_*ज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनावर मर्यादा आणाव्यात*_
एसटीमध्ये साधारण एक लाख दोन हजार कर्मचारी सध्या कार्यरत असून त्यांच्या *वेतनासाठी भविष्य निर्वाह निधीतला हिस्सा तसेच इतर रक्कम धरून एकूण 270 ते 280 कोटी महिन्याचा खर्च होतो.* त्यापैकी 27 हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण रुपये शंभर कोटी खर्च होतात तसेच राहिलेल्या साधारण 75 हजार कर्मचाऱ्यांवर साधारण *170 ते 180 कोटी खर्च होतो* याचाच अर्थ ज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनावर मर्यादा आणाव्या लागतील.त्यांच्यासाठी चांगली फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणावी व असे कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त झाले तर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल व भविष्यात चांगली वेतनवाढ सुद्धा करता येईल. या शिवाय यापुढे अजून काही महिने वाहतूक सुरळीत होणार नाही अशी शक्यता आहे.
_*कंत्राटी कामगार चार कोटींचा खर्च*_
एसटी महामंडळा मध्यें *अंदाजे सोळाशे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्यांच्यावर साधारण चार कोटींचा खर्च होत आहे.* तो खर्च वाचविण्यासाठी एसटी मधिल अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागी काम द्यावे. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काम मिळेल व त्या मुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जो खर्च होतो त्याची बचत होऊन एसटीचे महिन्याला अंदाजे चार कोटी वाचतील असेही या निवेदनात नमूद करण्यातआले आहें.यावेळी संघटनेचे *सरचिटणीस श्रीरंग बरगे* (कोषाध्यक्ष) *संतोष गायकवाड* हे हजर होते.

Previous articleपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून ‘सह्याद्री’वरून धडे ; वर्षा गायकवाड यांची माहिती –
Next articleनांदेड जिल्ह्यात आज ३२ बाधितांची भर तर कोरोनातून आज ४० रूग्ण बरे व दोनजणांचा मृत्यू –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here