🛑 गडचिरोलीसह राज्यातील शाळा ३ ऑगस्ट पासून सुरू होणार….! वडेट्टीवार..

0
33

🛑 गडचिरोलीसह राज्यातील शाळा ३ ऑगस्ट पासून सुरू होणार….! वडेट्टीवार.. 🛑
✍️गडचिरोली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

गडचिरोली :⭕ गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली, त्यात त्यांनी ही माहिती दिली. सध्याची स्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क,सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात,असे निर्देशही त्यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांचा एक महिन्यात निपटारा करावा.वनहक्क दाव्यांच्या मंजुरीबाबत प्रादेशिक स्तरावर मंजुरीचे आदेश असावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.तसेच ५ हेक्टपर्यंतचे अधिकार उपवनसंरक्षकांकडे ठेवण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रशासनाचे परिश्रम व जनतेच्या सहकार्याने जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. जिल्हयातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुन्हा ५ कोटी निधी येत्या आठ दिवसांत जिल्हयाला प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली….⭕

Previous articleत्याचा गुन्हा इतकाच होता की हे उंटाच पिल्लू चुकून शेतात घुसलं म्हणून त्या क्रुर हैवानांनी त्याचे पाय छाटले – निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू –
Next article🛑 मुंबईच्या डबेवाल्यांसमोर दुहेरी संकट 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here