🛑 **पुणेकरांसाठी खुशखबर…. ! खरेदीसाठी रविवारी दुकाने दिवसभर राहणार सुरु ;- आयुक्तांची माहिती **🛑

0
26

🛑 **पुणेकरांसाठी खुशखबर…. ! खरेदीसाठी रविवारी दुकाने दिवसभर राहणार सुरु ;- आयुक्तांची माहिती **🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिले पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदीकरिता वेळ मिळावा याकरिता सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

त्यानुसार, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांनी लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार याचे सविस्तर आदेश काढले होते.

पहिले पाच दिवस कडक आणि नंतरचे पाच दिवस सौम्य लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यातील पहिल्या पाच दिवसांची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारपासून सौम्य लॉकडाऊन सुरू होणार आहे.

रविवारपासून दुकाने सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत उघडण्यास मुभा देण्यात येणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ रविवार करिता सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सहा तासांची सवलत प्रशासनाने दिली आहे.

सोमवारपासून मात्र सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेतच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. दुपारनंतर पुन्हा सर्व बंद ठेवावे लागणार आहे. नागरिकांनी नियम व निकषांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे….⭕

Previous article🛑 पुणे शहर करोना अपडेट 🛑
Next article🛑 **गणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी….! मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here