नांदेड” कोरोनातून ५ रूग्ण बरे तर जिल्ह्यात ४० व्यक्ती बाधित व हिंगोली येथील एकाचा मृत्यू , एकूण मृत्यू ३६ – नांदेड,दि. १४ ; राजेश एन भांगे

0
24

नांदेड” कोरोनातून ५ रूग्ण बरे तर जिल्ह्यात ४० व्यक्ती बाधित व हिंगोली येथील एकाचा मृत्यू , एकूण मृत्यू ३६ –
नांदेड,दि. १४ ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात आज 14 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 40 व्यक्ती बाधित तर हिंगोली येथील एका महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. आज एकुण 250 अहवालापैकी 196 निगेटिव्ह अहवाल आले. आजवर एकुण बाधितांची संख्या 690 एवढी झाली आहे. 5 बाधित आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 390 बाधितांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवार 13 जुलै रोजी मंगळवार पेठ हिंगोली येथील 45 वर्षाच्या कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 36 एवढी झाली आहे.

✔️ जिल्ह्यात आज रोजी सापडलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांचा तपशील खलीलप्रमाणे :

☑️नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 39 वर्षाची 1 महिला,

☑️ पद्मजा सिटी असर्जन नांदेड येथील 36,38,44,52 वर्षाचे 4 पुरुष, 14 व 35 वर्षाच्या 2 महिला,

☑️रहिमपूरनगर नांदेड येथील 45 वर्षाचा 1 पुरुष,

☑️गणराजनगर नांदेड येथील 45 वर्षाचा 1 पुरुष,

☑️गानिपुरा नांदेड येथील 65 वर्षाची 1 महिला,

☑️काबरानगर नांदेड येथील 24 वर्षाचा 1 पुरुष,

☑️हडको नांदेड येथील 65 वर्षाची 1 महिला,

☑️देगलूर साधना नगर येथील 13 व 21 वर्षाचे 2 पुरुष, तर 10, 17, 29, 65 वर्षाचे 4 महिला,

☑️किनवट येथील 30 वर्षाचा 1 पुरुष,

☑️इमामवाडी ता. कंधार येथील 25 वर्षाची 1 महिला, ☑️फुलवाल कंधार येथील 64 वर्षाचा 1 पुरुष,

☑️मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 31 वर्षाचा 1 पुरुष, 25 व 32 वर्षाच्या 2 महिला,

☑️हासनाद ता. मुखेड 24 वर्षाची 1 महिला,

☑️गोरक्षण गल्ली ता. मुखेड येथील 10, 31 वर्षाचे 2 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला,

☑️बालाजी गल्ली नर्सी ता. नायगाव येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, 22 वर्षाची 1 महिला,

☑️श्यमानगर नर्सी ता. नायगाव येथील 17, 19 वर्षाचे 2 पुरुष, 37 व 19 वर्षाच्या 2 महिला,

☑️ हदगाव येथील 35 वर्षाची 1 महिला,

☑️पटेलनगर ता. धर्माबाद येथील 38 वर्षाचा 1 पुरुष,

☑️ग्रा. रु. धर्माबाद येथील 31 वर्षाचा एक पुरुष,

☑️विठ्ठल मंदिर जवळ शिवाजीनगर ता. धर्माबाद येथील 65 वर्षाचा 1 पुरुष,

☑️गंगाखेड जि. परभणी येथील 48 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.

आज रोजी 264 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 15 महिला बाधित व 19 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 392 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.

आज रोजी एकुण 690 बाधितांपैकी 36 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 390 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 264 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 76, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 80, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 34, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 13, जिल्हा रुग्णालय येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 9, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 5 बाधित, धर्माबाद कोविड सेंटर येथे 3 बाधित, कंधार कोविड सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 19 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

✔️जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे.

☑️सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 950,

☑️घेतलेले स्वॅब- 8 हजार 728,

☑️निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 50.

☑️आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 40.

☑️एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 690,

☑️आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,

☑️आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

☑️मृत्यू संख्या- 36,

☑️रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 390,

☑️रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 264,

☑️प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 392 एवढी संख्या आहे.

✅️नांदेड आरोग्य विभाचे महत्वाचे आवाहन!

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here