*तर कौळाणे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडले जाईल*

0
167

*तर कौळाणे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडले जाईल*
*मालेगांव (युवा मराठा न्युज ब्युरो टिम)*येत्या ८आँगस्टला कौळाणे (निं)ग्रामपंचायत सरपंचाच कार्यकाळ समाप्त होत असून,शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार गावात सरपंचपदाचा कार्यभार हा पालकमंत्र्याच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेऊन आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला सरपंचपदाचा कार्यभार सोपविणार असल्याचा हा शासकीय निर्णय विश्वासघातकी असून तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही तो डाव हाणून पाडला जाईल असा इशारा युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,सध्या कोरोनासारख्या महामारी संकटात जरी निवडणुका घेणे शक्य नसले तरी हा शासनाचा विश्वासघातकी निर्णय गावावर बळजबरीने व पालकमंत्र्याचा हुकूमातला एक्का या पदावर बसविण्याचा हा डाव कदापीही खपवून घेतला जाणार नाही.त्याऐवजी शासनाने पंचायत सामितीचे विस्तार अधिकारी यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे किंवा गावात ग्रामसभा घेऊन बहुमताने सरपंच निवडला जावा.परस्पर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा पालकमंत्र्याच्या शिफारशीवरुन कुणाचीही सरपंचपदावर वर्णी लावू नये.अन्यथा येत्या ९आँगस्ट पासून कौळाणे (निं)ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र पाटील राऊत यांनी पत्रकातून दिला आहे.
तर राज्यपाल ,मुख्यमंत्री,पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कौळाणे ग्रामस्थांच्या सहयाचे निवेदन देण्यात येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दी पत्रकातून नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here