🛑 शिवसेनेचे माजी खासदार आढळराव यांची कोरोना चाचणी….🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

0
37

🛑 शिवसेनेचे माजी खासदार आढळराव यांची कोरोना चाचणी….🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

शिक्रापूर (पुणे):⭕ माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या एका सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांचाही स्वॅब आरोग्य खात्याने नेला असून, त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. गेली साडेतीन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्यागत फिरणा-या आढळरावांना आता किमान त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत फिरता येणार नाही.
आढळराव पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही सतत कार्यमग्न व मतदारसंघातील सर्व स्तरांत संपर्कात राहिलेले आहेत. याच कारणाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही त्यांच्याशी सतत संवादात असतात. गेली साडेतीन महिने स्वत:चा फिटनेस संभाळून कोरोनाच्या प्रभावकाळात व प्रभाव क्षेत्रात ते मतदार संघातील बहुतेक गावांमध्ये सतत फिरत होते. मात्र, आज त्यांच्या एका सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. याबाबत शिवसेनेच्या काही मोजक्या पदाधिका-यांना ही माहिती. त्यानंतर आढळराव पाटील यांचे फोन खणखणून लागले. या माहितीला त्यांच्या कार्यालयानेही दुजोरा दिला असून, संबधित सुरक्षा रक्षकाचे संपर्कातील सर्वांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी पाठविण्याच्या सुचना स्वत: आढळराव यांनी आपल्या कार्यलायाला दिल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आढळराव यांना आता त्यांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत फिरता येणार नाही, हे नक्की.
माझ्या सुरक्षा रक्षकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र, त्याच्या ड्यूटीमुळे त्याचा माझा थेटपणे संपर्क खूप कमी आलेला आहे. मी व माझ्या जवळच्या बहुतेकांनी एन-१९ मास्क वापरण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची लक्षणेही मला व माझ्या जवळच्या स्नेह्यांना सध्या तरी दिसत नाहीत. तरीही मी व संपर्क शक्यता असलेल्यांचे स्वॅब मी स्वत:हून देत असून, आम्हा सर्वांच्या अहवालाची मला प्रतिक्षा आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील,
माजी खासदार…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here