🛑 मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बॅक ऑफ बडोदाची 1 कोटींची मदत 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

0
36

🛑 मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बॅक ऑफ बडोदाची 1 कोटींची मदत 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 जुलै : ⭕ कोरोनाने साऱ्या जगात धुमाकुळ घातला असुन दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढतच चालली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आणि त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहे. तसेच कोरोनामुळे वाढतच चाललेली रुग्णसंख्या हा सुद्धा चिंतेचा विषय बनला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. म्हणुनच बॅक ऑफ बडोदाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

यावेळी बॅक ऑफ बडोदा मुंबई विभागाचे जनरल मॅनेजर मधुर कुमार तसेच डेप्युटी झोनल हेड पी.के. राऊत उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरुन ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी बॅक ऑफ बडोदाचे आभार मानले.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here