🛑 कोरोनामुळे कनिष्ठ वकिलांवर आर्थिक संकट 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

0
141

🛑 कोरोनामुळे कनिष्ठ वकिलांवर आर्थिक संकट 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर कनिष्ठ वकील काही काळ ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. त्यांना कायद्याच्या ज्ञानाबरोबरच काही ठराविक रक्कम ज्येष्ठ वकिलांकडून मिळते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने कनिष्ठ वकिलांना आर्थिक अडचणीबरोबर इतर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांची संख्या मोठी आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर साधारण 5 वर्षे तरी कनिष्ठ वकिलांना ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागते. हेच त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. यातून कनिष्ठ वकील आपला खर्च, घरभाडे देत असतात. न्यायालयीन कामकाज बंद असल्याने सर्व वकिलांचा आर्थिक स्रोत पूर्णपणे बंद झाला आहे. न्यायालयाचे कामकाज फक्त एका सत्रात सुरू आहे. यावेळी अतिमहत्त्वाच्या प्रकारची सुनावणी घेण्यात येत आहे. यामुळे कनिष्ठ काम पण आणि पैसे पण नाही असा दुहेरी संकट कनिष्ठ वकिलांसमोर उभे राहिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयात महत्त्वाचे खटले वगळता इतर सर्व कामकाज बंद आहे. याचा फटका समस्त वकील वर्गाला बसला आहे. यामुळे त्यांना खर्च भागविणे सुद्धा अवघड झाले आहे. ज्येष्ठ वकिलांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार्‍या कनिष्ठ वकिलांना पगार देणे अवघड झाले आहे. ज्येष्ठ वकिलांच्या हाताखाली साधारण 2 ते 10 कनिष्ठ वकील असतात. त्यांना महिन्याकाठी ठराविक रक्कम देण्यात येते. तीन महिन्यांपासून न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने वरिष्ठ वकिलांना आता आपल्या कनिष्ठ वकिलांना पगार देणे अवघड झाले आहे.

आर्थिक स्रोत बंद पडल्याने अनेक कनिष्ठ वकिलांनी आपले मूळ गाव गाठणे पसंत केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही. तोपर्यंत पुण्यात परतणार नसल्याचे अनेक कनिष्ठ वकील सांगत आहेत. सध्या न्यायालयात सकाळी एका सत्रात सुरू आहे. यावेळी फक्त महत्त्वाचे खटले सुनावणीसाठी घेण्यात येतात. यामुळे प्रॅक्टिस पूर्णपणे बंद आहे. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ वकिलांना दरमहा 5 हजार मदतनिधी देण्याची माणगी बार कौन्सिल आणि महाराष्ट्र आणि गोवा यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून महत्त्वाचे सुनावणी व्यतिरिक्त न्यायालयीन कामकाज बंद आहे. नवीन पक्षकार न्यायालयात येत नाहीत. यामुळे तरूण वकिलांचे उत्पन्न बंद झाले आहे. याचा फटका तरूण वकिलांना बसला असून ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना अत्यावश्यक वस्तूंचे संच पुणे बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आले होते….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here