🛑 मराठा आरक्षणावरील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल देणे शक्य नाही…! सुप्रीम कोर्टाचे मत…! 🛑 ✍️नवी दिल्ली :( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
35

🛑 मराठा आरक्षणावरील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल देणे शक्य नाही…! सुप्रीम कोर्टाचे मत…! 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरु झाल्यानंतरच यावर निकाल येणार आहे. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपल्या बाजू ठोसपणे मांडल्या
मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूनच निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणास मान्यता देणाऱ्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याकडे कल दर्शवला.
ही सुनावणी एमबीबीएसच्या पदव्युत्तर प्रवेशाच्या विषयावर होती. याबाबत नीटच्या जानेवारीत परीक्षा झाल्या. त्याचा निकाल 24 जानेवारी रोजी लागला. मात्र, त्यानंतर प्रवेश सुरु होऊनही राज्य सरकारने हे एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया संपवायला हवी होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे 15 मे रोजी पहिली फेरी झाली. 6 जुलैला दुसरी फेरी झाली. त्यातच 4 मे रोजी मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये अशी याचिका दाखल झाली. यानंतर 9 जूनला एक याचिका दाखल झाली. आता स्टेट काऊन्सिलला 30 जुलैच्या आधी या प्रवेश प्रक्रिया संपवायच्या आहेत. राज्य सरकारमधील काही अधिकारी आहेत जे संबंधित विरोधी याचिकाकर्त्यांना कागदपत्रं पुरवतात त्यामुळे अडथळे येत आहेत.’ अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिली.

या सुनावणीसाठी छत्रपती संभाजी राजे यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामधील आरक्षणाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाबाबतही सुनावणी होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

⭕ मराठा आरक्षण ताजा घटनाक्रम ⭕

30 नोव्हें 2018 – विधानसभेत मराठा आरक्षणाला मंजुरी
27 जून 2019 – मुंबई हायकोर्टाची आरक्षणावर मोहोर
12 जुलै 2019 – आरक्षणाची घटनात्मक वैधता तपासू : सुप्रीम कोर्ट
19 नोव्हेंबर 2019 – 22 जाने 2020 पासून सुनावणी करु : सुप्रीम कोर्ट
5 फेब्रुवारी 2020 – हायकोर्टाच्या निर्णयास स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार
17 मार्च 2020 – सुप्रीम कोर्ट म्हणाले 7 जुलैपासून सुनावणी करु
10 जून 2020 – मुख्य याचिकेसोबतच मेडिकल-डेंटलच्या याचिकांवर निकाल
7 जुलै 2020 – सर्वच याचिकांवर अंतिम सुनावणी

महाराष्ट्रात 74% आरक्षण

अनुसूचित जाती -13%
अनुसूचित जमाती – 7%
इतर मागासवर्गीय – 19%
विशेष मागासवर्गीय – 2%
विमुक्त जाती- 3%
NT – 2.5%
NT धनगर – 3.5%
VJNT – 2%
मराठा – 12%
आर्थिकदृष्ट्या मागास – 10%

⭕❗⭕❗⭕❗⭕❗

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here