खासदार उदयनराजे यांच्या कडून शहरातील ग्रेड सेपरेटरची पाहणी 🛑 ✍️सातारा :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
29

🛑 खासदार उदयनराजे यांच्या कडून शहरातील ग्रेड सेपरेटरची पाहणी 🛑
✍️सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ सातारा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध विकास कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन झालेल्या व होणाऱ्या कामांची पाहणी केली व अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत असताना विकासकामांच्या वर जरी मर्यादा आल्या असल्या तरीसुद्धा येणाऱ्या काळात योग्य नियोजन करून लोकहिताची कामे मार्गी लावणे बाबत सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी असा सल्ला दिला.

महत्वाच्या विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेऊन संबंधितांच्या बरोबर युनियन क्लब, यादवगोपाळ पेठ बगीच्या, जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होणाऱ्या आर्ट गॅलरी, सदाशिव पेठ भाजी मंडई, करंजे येथील होणारी पाण्याची टाकी व नवीन शाळा, माजगावकर माळ घरकुल योजना, हुतात्मा स्मारक इत्यादी ठिकाणी च्या कामांची जागेवर जाऊन पाहणी केली युनियन क्लब चे पाठीमागील बाजूस नगरपरिषदेची ५७ गुंठे मोकळी जागा आहे सदर जागेचा चांगला विनियोग करताना युनियन क्लब शी बोलणी करून चांगले नियोजन करता येईल या मोकळ्या जागेत युनियन क्लब ची जुनी इमारत ही नव्याने बांधून चांगली वस्तु या ठिकाणी निर्माण करता येईल.

यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व सर्व नगरसेवक उपस्थित होते…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here