🛑 वारजे स्मशानभूमीला मरण कळा 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )

0
37

🛑 वारजे स्मशानभूमीला मरण कळा 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )

पुणे/वारजे :⭕ महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना प्राथमिक गरजा कोणत्या? तर रस्ते, वीज, पाणी, शाळा, स्वच्छता आणि या स्वच्छतेला जोडून येते निसर्ग संवर्धन ज्याला बागा म्हणता येतील आणि मृत्यू पश्चात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुसज्ज स्मशानभूमी आणि त्यांनतर येतात त्या व्यायामशाळा, नाट्यगृह, परिसर सुंदर दिसणाऱ्या निरनिराळ्या शोभेच्या वस्तू. असे असताना वारजे मध्ये कोट्यावधींची विकासकामे झाली, उपमहापौर पद आले, दोन वेळा पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पद या भागाला मिळाले, खडकवासला विधानसभेची उमेदवारी देखील याच भागाला दोन वेळा दिली गेली असे ढोल बडवले जाणाऱ्या वारजेतील नागरिकांना अद्याप सुसज्ज स्मशानभूमी मिळत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. आपण स्क्रीनवर बघू शकताय वारजे स्मशानभूमीची सध्याची दुरावस्था…

वारजे बरोबर पुणे महानगरपालिकेत १९९७ मध्ये समाविष्ठ झालेल्या सिंहगड रोड वरील वडगाव’ला पुण्यातील पहिली डीझेल दाहिनी होते,

कात्रजची स्मशानभूमी ही महाराष्ट्रातील पहिली पंचतारांकित आणि सर्वधर्मीय स्मशानभूमी झाली, तिथे स्मशानात नव्हे तर बागेत आल्याचा फील येतो. बाणेर परिसर तर स्मार्ट पुण्याचा चेहराच म्हाणावा लागेल, तिथेही सुसज्ज अशी विद्युत दाहिनी आहे.

हडपसर मध्ये देखील डीझेल दाहिनीसह सुसज्ज स्मशानभूमी होते. मात्र वारजे याला अपवाद का ठरते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पाहूयात याबाबत काय म्हणत आहेत या भागातील लोकप्रतिनिधी माजी उप महापौर, माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दिलीप बराटे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here