गृहमंत्र्यांनी केला उदयनराजे भोसले यांना मुजरा..! 🛑 ✍️ सातारा :(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
35

 

🛑 गृहमंत्र्यांनी केला उदयनराजे भोसले यांना मुजरा..! 🛑
✍️ सातारा :(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ राज्याचे गृहमंत्री शंभूराजे देसाई हे उदयनराजे भोसले यांना लवून मुजरा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज अनेक व्हाट्सअप्प ग्रुपवर हा फॉरवर्ड होताना दिसत आहे. या पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक लावून तो व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री असोत किंवा अजून कोणी आमच्या राजांसमोर ते झुकतात असं यातून उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांना दाखावायचं असल्याच्या चर्चा सुरू आहे.

खरंतर, सध्या उदयनराजे भोसले यांच्याकडे कोणतंही पद नाही. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज हेच त्यांच्यासाठी मोठं पद आहे.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यामुळे शंभूराजे देसाई यांनीही त्यांना त्यांच्या गादीला तो मान दिला असेल…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here