🛑 मोठा आवाज आला आणि नशीबच गाडले गेले 🛑 ✍️ नाशिक :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
34

🛑 मोठा आवाज आला आणि नशीबच गाडले गेले 🛑
✍️ नाशिक 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक/ अंबासन :⭕ येथील हरी कापडणीस यांची गट क्रमांक 431 मध्ये दोन एकर शेती असून, याच शेतीवर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मोठा आवाज झाल्याने शेतातील रहिवाशांमध्ये भीती पसरली होती.

कापडणीस यांचे नशीबच गाडले गेले. ​
अल्पभूधारक शेतकऱ्याने पाच वर्षांपूर्वी घरातील सोने गहाण ठेवून आणि नातेवाइकांकडून हातउसनवारी करीत शेतात विहीर खोदली. वीजजोडणीसह चार लाखांपर्यंत खर्च आला. या कर्जानंतर आता शेतीत चांगले दिवस येत असतानाच सायंकाळी विहिरीवर वीज कोसळली आणि त्या विजेने विहीर नाही तर कापडणीस यांचे नशीबच गाडले गेले.वीज कोसळल्यानंतर त्यांच्या डोळ्यांसमोरच विहीर जमीनदोस्त झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
वीज विहिरीत कोसळल्यानंतर संपूर्ण शिवार हादरून गेले होते.
विहीर पूर्णपणे ढासळली आणि जवळच असलेल्या विजेचा खांबही विहिरीत गाडला गेला. ग्रामपंचायत सदस्य मधुकर कापडणीस यांनी महसूलचे तलाठी व वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात माहिती दिली. तलाठी योगेश मेश्राम, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रवी धोटे यांनी पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here