🛑 *विनोदी अभिनेते लिलाधर कांबळी यांचे निधन*🛑 ✍️ ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
38

🛑 *विनोदी अभिनेते लिलाधर कांबळी यांचे निधन*🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे – ⭕मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये विनोदी भूमिकांनी जनमानसात ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निलांबरी आणि तीन मुली असा परिवार आहे. कांबळी यांच्यावर ठाण्यातील बाळकुम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कांबळी हे मुळ कोकणातल्या मालवणमधील रेवंडीचे. राजा गोसावी, बबन प्रभू, आत्माराम भेडे यांच्या पाठोपाठ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाचा ठसा त्यांनी उमटविला. लेकुर उंदडे झाली, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, यासह १०० हुन आधिक नाटकात त्यांनी भूमिका केल्या

वस्त्रहरण या नाटकातील जोशी मास्तर या भूमिकेने ते घराघरात पोहचले. काचेचा चंद्र ,हिमालायची सावली ह्यासारख्या नाटकातही त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या.

सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाय, श्वास, बीज (हिंदी), सविता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या या चिञपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या.

गोट्या, बे दुणे तीन, हसवणूक, गंगुबाई नॉन मॅट्रीक या मालिकांमधून ते घराघरात पोहचले होते. वात्रट मेले ह्या विनोदी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. या नाटकाचे अडीच हजार प्रयोग झाले. अंगविक्षेप न करता सहज अभिनयातून साकारलेला विनोद त्यांच्या अभिनयाचे वैशिष्टये होते.⭕

Previous article🛑 जिल्हाच्या बाहेर एसटीने प्रवास करायचा असेल..तर जाणुन घ्या माहिती…! 🛑
Next article🛑 मोठा आवाज आला आणि नशीबच गाडले गेले 🛑 ✍️ नाशिक :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here