धकादायक! भाडेकरु महिलेस घरमालकसह नातेवाईकाने जीवंत जाळले प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव नाशिक

0
34

धकादायक! भाडेकरु महिलेस घरमालकसह नातेवाईकाने जीवंत जाळले प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव नाशिक

नाशिक : नाशिक शहरात एक धक्कादयक घटना समोर आली आहे. 30 जूनला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक भाडेकरु महिलेला घर मालक व नातेवाईक यांच्यात बाचाबाची झाली म्हणून जिवंत जाळण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे थकले होते. त्याबाबत घरमालकाकडून तगादा सुरू होता. गेल्या मंगळवारी (ता. 30) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संशयित घरभाडे घेण्यासाठी गेले असता त्यावरून बाचाबाची झाली.शहरातील आयेशा असिम शेख (18, रा. भारतनगर, वडाळारोड) असे मयत महिलेचे नाव आहे. बबू (पूर्ण नाव नाही), अश्रम बाबुलाल शेख (32, रा. शिवाजीवाडी, भारतनगर), राणी, अमन (पूर्ण नावे नाहीत) अशी संशयितांची नावे आहेत. आयेशा शेख यांच्या फिर्यादीनुसार, पती असिम व मुलगा यांच्यासह त्या भारतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे थकले होते.त्यावेळी संशयित बबू, अश्रफ व राणी यांनी आयेशा शेख हिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले, असे आयेशा हिने कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गंभीररित्या भाजलेल्या आयेशा यांना तिचे पती असिम यांनी गेल्या मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, बुधवारी (ता. 1) रात्री मृत्यु झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here