वडेट्टीवार हटवा! सारथी टिकवा…! मराठा क्रांती मोर्चाची मागणी ! ✍️ पुणे ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
163

🛑 वडेट्टीवार हटवा! सारथी टिकवा…! मराठा क्रांती मोर्चाची मागणी ! 🛑
✍️ पुणे ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सारथी संस्थेच्या स्थितीला जबाबदार असलेल्या बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना हटवावे म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अडवण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. यावेळी थोरात यांनी संबंधितांना भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
यानंतर निघताना बाळासाहेब थोरात यांच्यासमोर हातात फलक धरून काही कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार यांना हटवावे म्हणून आंदोलन करण्यास सुरूवात केली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्याची काही सेकंद भेट घेवून पुढे जाणे पसंत केले.
तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेला सरकार पुरेशी मदत करत नसल्याचे मत यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आले…⭕

Previous articleटिकटाॅक होणार हद्द पार* *केंद्र सरकारने घेतला निर्णय* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज.*
Next articleराज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here