नांदेडतील कोविड केअर सेंटर येथील आज ४ रूग्ण बरे झाले तर त्या कोरोना पॉसिटीव्ह आमदार व कुटुंबियांना औरंगाबाद येथे संदर्भित केले, तसेच आज २ रुग्णांची भर – नांदेड, दि. २८ ; राजेश एन भांगे

0
30

नांदेडतील कोविड केअर सेंटर येथील आज ४ रूग्ण बरे झाले तर त्या कोरोना पॉसिटीव्ह आमदार व कुटुंबियांना औरंगाबाद येथे संदर्भित केले, तसेच आज २ रुग्णांची भर – नांदेड, दि. २८ ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील 367 बाधितांपैकी एकूण 279 व्यक्ती कोरोनातून बरे झाले. रविवार 28 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 114 अहवालापैकी 79 अहवाल निगेटिव्ह तर 18 नवीन बाधित व्यक्ती आढळले.

आज प्राप्त झालेल्या आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार नांदेड जिल्ह्यात सापडलेल्या 18 कोरोना बाधित रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

नवीन बाधितांमध्ये विष्णपुरी येथील सहा महिला रुग्ण वय वर्षे अनुक्रमे 5, 5, 25, 29, 45, 57 व तीन पुरुष वय वर्षे अनुक्रमे 6, 19, 35 आहेत. खुबा मस्जित – सिडको नांदेड येथील वयवर्षे 43 ची एक महिला व दोन पुरुष वय वर्षे 24, 50 चे आहेत. पिरबुऱ्हानगर येथील 4 वर्षाचे 1 बालक, आंबेडकर नगर येथील 55 वयवर्षे असलेला एक पुरुष, 41 वर्षे वयाचा गवळीपूरा येथील एक पुरुष, चैतन्यनगर येथील 48 वर्षे वयाचा एक पुरुष तसेच गॅस गोडाऊन, लोहा येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, बळेगाव तालुका देगलूर” येथील 21 वर्षे वयाचा एक पुरुष यांचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.

सदरील अहवालातील 18 रुग्णांमध्ये काल रात्री दि 27 जून रोजी आलेल्या १६ जणांचा अहवालात समावेश आहे व आज सायंकाळपर्यंत दोन रुग्णांची भर पडली आहे. त्या
नवीन रुग्णांचा खालील प्रमाणे:

☑️ आंबेडकर नगर येथील ५५ वर्षीय पुरुष तसेच

☑️लोहा गॅस गोडावून जवळ, पुरुष वय : ३१

व तसेच काँग्रेस पक्षाचे आमदार मोहनराव हंबर्डे व त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

✔️जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 367 बाधितांपैकी एकूण 279 व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 16 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. औषधोपचार चालू असलेल्या 72 बाधितांपैकी 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50 व 55 वर्षाच्या दोन स्त्री व 38, 42, 67 व 75 वर्षाचे चार बाधित पुरुषांचा समावेश आहे. 7 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 2 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 367 वर.
☑️ दिवसभरात 4 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 279 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️16 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️72 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 4 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ उपचारास्तव 7 रुग्ण औरंगाबाद 1 सोलापूर
येथे संदर्भीत.

रविवार दिनांक 28 जून रोजी 74 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

✅️नांदेड आरोग्य विभागाचे महत्वाचे आवाहन!

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here